पिंपरी-चिंचवड शहरातील 59 केंद्रांवर सोमवारी मिळणार लस
![The vaccine will be available at 59 centers in Pimpri-Chinchwad on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Covid-Vaccine-1.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण सोमवारी (दि. 23) सुरू आहे. शहरातील 57 केंद्रांवर कोविशिल्ड आणि 2 केंद्रांवर कोव्हॅक्सीन या लसीचे डोस मिळणार आहेत.सोमवारी कोविशिल्ड या लसीचा वय 18 ते 44 या वयोगटातील लाभार्थींना 57 केंद्रांवर पहिला आणि दुसरा डोस मिळणार आहे. सोमवारी 18 वर्षे वयापेक्षा अधिक वयोगटातील सर्व लाभार्थींना कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस दोन केंद्रावर मिळणार आहे.
शहरातील आठ केंद्रांवर सोमवारी स्तनदा व गरोदर महिलांचे लसीकरण करण्यासाठी काही डोस शिल्लक ठेवण्यात आले आहेत. लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत करण्यात येईल. कोविन ॲपवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी सकाळी आठ नंतर स्लॉट, बुकिंग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी लसीकरण केंद्रांवर सोमवारी सकाळी नऊ वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे वेळेपूर्वी नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.