करोनानंतर महाराष्ट्रात गोवरचा भयंकर प्रकोप, सुरूवातीची ही लक्षणं घातक, काय कराल हे उपाय
![Terrible outbreak of measles in Maharashtra after Corona, these initial symptoms are dangerous, what to do](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Gover-680x470.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गोवर हा गोवर व्हायरसमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण होते, तेव्हा संसर्ग दहा दिवसांपर्यंत टिकू शकतो. महाराष्ट्र आणि राजधानी मुंबईत हा संसर्ग झपाट्याने पसरत असून अनेक बालकांचा यामुळे मृत्यूही झाला आहे.
महाराष्ट्रात करोनानंतर गोवरचा भयंकर प्रकोप, सुरूवातीची ही लक्षणं घातक, करा हे उपाय
कोरोना व्हायरस (corona virus) आता हळूहळू कुठे थांबतो न थांबतोच तो आता एक नवीन धोका समोर आला आहे. बातमीनुसार महाराष्ट्र आणि मुंबईच्या काही भागात गोवरची साथ वेगाने पसरत आहे आणि यामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. गोवर हा एक असा आजार आहे ज्याचे संक्रमण अत्यंत वेगाने पसरते आणि एका वेळेस शेकडो लोकांना कवेत घेऊ शकते.
कपिवा गेट स्लिम ज्यूसचे नियमित सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
या प्रकरणांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गोवरची साथ वैद्यकीय क्षेत्रात मोठी धोकादायक मानली जाते. पण हा आजार नक्की हे काय? कशामुळे होतो? लक्षणे काय? कारणे काय? मुख्य म्हणजे यावर उपाय काय? चला या सर्व गोष्टी आपण आजच्या या लेखातून जाणून घेऊया.
गोवर म्हणजे काय?
गोवर हा एक संक्रमणयुक्त आजार आहे. जो गोवरच्या व्हायरसमुळे पसरला जातो. जेव्हा कोणी व्यक्ती या व्हायरसमुळे संक्रमित होतो तेव्हा हे संक्रमण खूप दिवस राहू शकते. या दरम्यानच्या काळात ताप येतो आणि शरीरावर चट्टे निर्माण होतात. या खेरीज कानात संक्रमण होणे, हगवण लागणे, न्यूमोनिया असे अनेक आजार देखील उद्भवतात. या आजारावर वेळीच उपचार घेऊन रुग्णाला सुरक्षित करणे महत्त्वाचे असते. अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोवरची लस महत्त्वाची का आहे?
WHO च्या अनुसार, गोवर विरुद्धची लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ही लस देखील खूप जास्त प्रभावी आहे. जर वेळीच बाळाल गोवरची लस दिली असेल तर त्याला हा आजार होण्याची शक्यता अत्यंत कमी असते आणि म्हणूनच प्रशासनातर्फे वेळीच बाळांना गोवरची लस देण्याचा सल्ला दिला जातो. भारतात ही लस मोफत दिली जाते. बाळाच्या शरीरातील गोवर विरुद्ध लढणारी रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी म्हणून ही लस देणे अत्यंत गरजेचे आहे.
गोवर हा आजार कसा पसरतो?
गोवरचा आजार एका व्हायरसमुळे होतो. गोवरने संक्रमित असणारे लहान बाळ व वृद्ध व्यक्तीच्या नाक आणि घशात हा व्हायरस उत्पन्न होतो आणि यामध्ये इतरांना मोठ्या प्रमाणावर संक्रमित करण्याची क्षमता असते. सोप्प्या शब्दात सांगायचे झाले रुग्ण खोकल्यावर किंवा त्याला शिंक आल्यावर वा तो बोलताना त्याच्या तोंडावाटे हा व्हायरस हवेत पसरतो आणि त्यावेळी जवळपास असणारे जे लोक श्वास घेतात तेव्हा त्या हवेवाटे व्हायरस त्यांच्या शरीरात जाऊन त्यांना संक्रमित करतो.
काय आहेत गोवरची लक्षणे?
गोवर हा आजार म्हणजे एक फ्लू स्ट्रेन आहे. याची लक्षणे सामान्य फ्ल्यू सारखीच असतात. ज्यामध्ये खूप जास्त ताप येतो, थकवा जाणवतो, खूप जास्त खोकला येतो, डोळे अगदी रक्तासारखे लाल लाल होतात. सतत नाक गळत राहते. गोवर आजारात अंगावर चट्टे सुद्धा येतात. जे डोक्यापासून सुरु होतात आणि मग शरीराच्या अन्य भागांमध्ये पसरू लागतात.
गोवरची गंभीर लक्षणे
गोवरची अजून काही गंभीर लक्षणे आहेत ज्यामध्ये घशात खवखव जाणवणे, तोंडात सफेद डाग येणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, प्रकाशामुळे संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यात वेदना होणे या लक्षणांचा समावेश असू शकतो.