breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

Skin Care Tips : हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची अशी काळजी घ्या..

Skin Care Tips : हिवाळ्याच्या काळात, निरोगी त्वचा राखण्यासाठी शरीरांतर्गत आणि बाह्य अश्या दोन्ही गोष्टीची विशेष खबरदारी घेणं आवश्यक आहे.

हायड्रेशन ही मुख्य गोष्ट आहे : हिवाळ्याच्या महिन्यांत आपण चांगले हायड्रेटेड राहण्याची खात्री करा. तुमची त्वचा आतून मॉइश्चराइज ठेवण्यासाठी भरपूर पाणी, हर्बल टी आणि कोमट सूप प्या.

मॉइश्चरायझिंग पदार्थांचा समावेश करा : बदाम, शेंगदाणे, फुटाणे, तीळ यासारख्या आवश्यक फॅटी ऍसिडने समृद्ध असलेले पदार्थ खा. हे त्वचेचे पोषण आणि नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन सी-युक्त आहार : हिवाळी फळांचा समावेश अत्यावश्यक. संत्री, पेरू, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांत आणि ज्यात व्हिटॅमिन सी आहे अश्या भाज्या खाणे उत्तम. ह्यामुळे इम्युनिटी पण वाढायला मदत होते.

हेही वाचा   –  राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यात गिव्ह ईट अप योजना लागू होणार 

कोमट पाणी, गरम नाही : आंघोळ करताना अति कढत गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरावे. गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते, ज्यामुळे कोरडेपणा वाढत जातो.

सौम्य साबण वापरा : सौम्य, हायड्रेटिंग साबण निवडा जे त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकत नाहीत. कठोर रसायने असलेले कठोर साबण आणि क्लीन्सर टाळा.

नियमितपणे मॉइश्चरायझ करा : तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा.

संतुलित आणि पोषक आहारासोबत हिवाळ्यात त्वचेला संपूर्ण मॉइश्चरायझ, निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत करू शकता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button