breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

Sunday आहे तर, आज काय स्पेशल ?…

Sunday म्हटलं की आळस आणि आराम …आणि वर्किंग लोकांसाठी तर sunday म्हणजे पर्वणीच…या दिवशी फक्त आराम करायचा आणि लोळत पडायच किंवा मस्त बाहेर कुठे जायचा प्लॅन करायचा…किंवा मग काहीजण रखडलेली कामे Suday ला पुर्ण करतात…पण या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाच काम करू शकतो आणि तेही sunday सोडून आपल्याला इतर दिवशी ते काम करायला एवढा वेळही नाही मिळत. ते काम आणि तो वेळ म्हणजे आपल्या त्वचेसाठी…sunday सोडून इतर दिवशी आपल्याला तेवढा वेळही नसतो की आपण आपल्या त्वचेसाठी आवर्जून लक्ष देऊ शकू…म्हणूच आज sunday ला दिवसरात कधीही तुम्ही कमी वेळात आणि आवर्जून आपल्या त्वचेसाठी काही घरगुती उपाय करू शकता…तर आज आपण टॅनिंगसाठी पाहणार आहोत काय उपाय आहेत ते…चला तर मग पाहुया कोणते उपाय आहेत ते.

लिंबाचा रस – लिंबाच्या रसात टॅन काढण्याचे गुणधर्म असतात. लिंबाचा रस टॅन झालेल्या त्वचेवर चोळल्यास लगेच फरक पडतो. मात्र, सौंदर्यतज्ज्ञांच्या मते लिंबाचा रस थेट त्वचेवर लावल्यावर कोणा-कोणाच्या चेह-याची आग होते किंवा चेह-याची त्वचा लाल होते, तर अशा वेळी लिंबाचा रस थोड्याशा पाण्यात मिसळून चेह-याला लावला तरी चालेन…वाळल्यावर थंड पाण्यानं त्वचा धुवावी.

टोमॅटोचा गर – टोमॅटोच्या गराइतकी टॅन घालवण्याची क्षमता एखाद्या टॅन रिमूव्हल क्रीममध्येसुद्धा नसावी. टोमॅटोचा दाट गर चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी धुतल्यास बराच फरक पडतो. लिंबाच्या रसाइतका परिणाम मिळत नसला, तरी ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी टोमॅटोचा गर वापरणं जास्त चांगलं. सलग एक आठवडा गर लावल्यास टॅन जाऊन त्वचा परत पूर्ववत होऊ शकते.

दही – अर्धा चमचा दही आणि किंचितशी हळद एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास टॅन जायला मदत होते. शिवाय, दह्यामुळे चेहरा फ्रेश होतो आणि मॉइश्चराइजही होतो.

बटाटा – बटाटा कापून त्याचा तुकडा त्वचेवर चोळून टॅन घालवता येतो. मात्र, तो नियमितपणे लावला, तरच फरक दिसून येतो. बटाट्याचे काप डोळ्यांना थंडावा देतात आणि काळी वर्तुळंही घालवू शकतात. 

कच्चे दूध आणि लिंबू एकत्र करुन ते काळवंडलेल्या त्वचेवर लावून ठेवल्यास त्याचा त्वचेचा काळेपणा निघून जाण्यास मदत होते. आठवड्यातून तीन वेळा हे केल्यास त्याचा फायदा होतो.

 लिंबू आणि साखर यांचे मिश्रणही काळवंडलेल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. लिंबाच्या रसात साखर योग्य पद्धतीने विरघळून ते मिश्रण हात आणि पाय तसेच हाताचे कोपर, काळवंडलेली मान या ठिकाणी लावावे. हे मिश्रन चिकट असल्याने आपल्याला काही वेळ नकोसे होते पण थोडा वेळ ठेवून धुवून टाकावे. हे नियमित लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

चंदन पावडर हे त्वचेसाठी रामबाण औषध आहे. पूर्वापार चालत आलेल्या या उपायाचा आजही तितकाच चांगला उपयोग होतो. चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून ते मिश्रण काळवंडलेल्या भागावर लावावे. चेहरा, हात, पाय अशा सगळ्या ठिकाणी १५ मिनिटांसाठी लावून ठेवल्यास त्वचेचा काळेपणा निघण्यास मदत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button