वाढत्या उन्हामुळे होऊ शकतो उष्माघात; बचाव करण्यासाठी ‘हे’ उपाय करा
Heat Stroke | दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की, उष्माघातामुळे झालेले मृत्यू ही बातमी आवर्जून वाचायला मिळते. आता हळुहळू उन्हाळ्याची चाहुल लागायला सुरूवात झाली आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी हे उपाय करा.
उष्णतेमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होऊ लागतात, ते परत मिळवण्यासाठी नारळपाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते व त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतात.
उष्माघात टाळण्यासाठी कांद्याचा वापर करावा. कांद्यामध्ये अँटी ऍलर्जी, अँटिऑक्सिडंट्स, कार्सिनोजेन या विशेष गुणधर्मामुळे तापमान नियंत्रणात राहते.
हेही वाचा – माजी क्रिकेटपटूचा मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण?
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्यावे.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कैरीचे पन्हे आवर्जून प्यावे. कैरीचे पन्हे प्यायल्यानंतर उन्हात गेल्यास उष्णता जाणवणार नाही.
दही आणि मीठापासून बनवलेले ताक उन्हाळ्यात प्यावे. यामुळे शरीर थंड होते व उष्माघाताचा धोका कमी होतो.