breaking-newsआरोग्य

स्वयंपाकापासून सौदर्यांपर्यंत नारळ तेलाचे फायदेच-फायदे, जाणून घ्या महत्व

Coconut Oil Benefits : भारतात नारळ तेलाची कमतरता नाही. यामुळे देशात नारळ तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नारळ तेल एक हेल्दी ऑईल असल्याचे तज्ज्ञांकडून म्हटले जाते. त्याचा वापर जेवणापासून शरीराच्या त्वचेपर्यंत केला जातो. देशातील प्रसिद्ध न्यूट्रीशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी नारळ तेलाचे फायदे सांगितले.

नारळ तेलामुळे फॅटी एसिडचे सहज पचन होते. नारळ तेल फॅट म्हणून शरीरात जमा होत नाही. उलट क्विक सोर्स ऑफ एनर्जी म्हटले जाते. यामुळे पोट भरलेले वाटते आणि भूख कमी लागते. परिणामी वजन कमी होते.

नारळ तेल हृदयासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असणारे लॉरिक एसिड गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करतो. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

नारळ तेलात लॉरिक एसिड, मोनोलॉरिनमध्ये एंटीमाइक्रोबियल आणि एंटीवायरल प्रोपर्टीज असतात. यामुळे नारळ तेलाचे सेवन केल्यास रोग प्रतिकार क्षमता वाढते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शरारातील पेशींचा क्षमता वाढते.

नारळ तेल त्वचेसाठी चांगले असते. त्वचेवर मॉइस्चराइज म्हणून ते काम करते. त्यामुळे शरीरावरील सूजही कमी होते. ते केसांचे पोषण करते. तसेच कंडीशन म्हणून ते काम करते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते.

नारळ तेलात व्हिटॅमिन डी असते. त्यामुळे चरबी वाढत नाही. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते आहे. यामुळे हाडांची घनता सुधारली जाते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button