महिनाभरासाठी लसूण-कांदा खाणे बंद केले तर शरीरात काय बदल
कांदा लसूण खाणे टाळणे योग्य आहे की नाही

आता नवरात्र सुरु आहे. जवळपास सर्वांचे उपवास आणि व्रत असतात. त्यामुळे जे लोक उपवास करतात किंवा देवीला नैवद्य दाखवतात ते लोक कांदे आणि लसूण अजिबात खात नाही. या दिवसांमध्ये सात्विक पदार्थ खाण्याची परंपरा असते.तर काही लोक इतरवेळी देखील कांदा आणि लसूण खात नाही. पण काहींना रोज भाज्यांमध्ये कांदा लसणाची सवय असते किंवा काहींना जेवणासोबत रोज कांदा खाण्याची सवय असते. कधी विचार केला की जर किमान महिनाभर जरी कांदा-लसूण खाणे सोडून दिले तर शरीरात काय फायदे होतील ते?
म्हणून धार्मिक लोक कांदा, लसूण खात नाहीत
आयुर्वेदानुसार, कांदे आणि लसूण खाणे टाळल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. कांदे आणि लसूण दोन्ही त्यांच्या तीव्र वासामुळे तामसिक पदार्थ मानले जातात. तामसिक पदार्थ तामसिक गुण जागृत करतात, ज्यामुळे राग, मत्सर, घमंड, प्रसिद्धीची इच्छा, स्वकेंद्रितता आणि सांसारिक सुखांची प्रचंड इच्छा हे गुण वाढता. शिवाय, ते अॅलियम प्रजातीतील आहेत त्यामुळे ते शरीरात अॅन्ड्रोजन किंवा लैंगिक उत्तेजक म्हणून काम करणारे फिनोलिक फायटोकेमिकल्सने समृद्ध असतात. आयुर्वेदानुसार, कांदे आणि लसूण लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी आणि वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी वापरले जातात. त्यांचे सेवन थेट मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते. त्यामुळे जे धार्मिक लोक आहेत किंवा पूर्णपणे साधनेत जे लोक असतात ते कांदा, लसूण खाणे टाळतात.
कांदा आणि लसूण सोडल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आणि शांत होते असे अनेक लोक मानतात, तर काहीजण म्हणतात की ते पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते. तर, सत्य काय आहे? कांदा आणि लसूण सोडल्याने खरोखरच आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो का ते फक्त एक मिथक आहे? चला जाणून घेऊयात.
कांदे आणि लसूण टाळल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? (तोटे)
शरीरातील उष्णता वाढू शकते.
लसूण आणि कांदा शरीराला थंडावा देतात. म्हणजेच ते शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास मदत करतात. जर तुम्ही अचानक ते खाणे बंद केले तर तुमच्या शरीरातील उष्णता वाढू शकते, ज्यामुळे डोकेदुखी, तोंडात अल्सर आणि त्वचेवर पुरळ उठू शकते.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
पचन समस्या वाढेल
लसूण आणि कांद्यामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतो. जे पचन सुधारण्यास मदत करतो आणि गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लता सारख्या समस्या कमी करतो. जर तुम्ही अचानक कांदा, लसूण खाणे बंद केले तर काही लोकांमध्ये पोटफुगी आणि अपचनाचा त्रास होऊ शकते.
हृदयाच्या आरोग्यावर परिणाम
लसूण हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे मानले जाते, जे कोलेस्टेरॉलही नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. ते टाळल्याने रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयरोगाचा धोका किंचित वाढू शकतो.
शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनवर परिणाम
लसूण आणि कांदे हे डिटॉक्सिफायिंग पदार्थ आहेत जे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. कांदा, लसूण खाणे अचानक बंद केले तर शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. ज्यामुळे थकवा, आळस आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते
लसूण हे एक नैसर्गिक अँटीबायोटिक मानले जाते, जे शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियापासून वाचवण्यास मदत करते. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतो, जो रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. हे दोन्ही पदार्थ अचानक खाणे बंद केले तर आजारांशी लढण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते.
कांदा-लसूण न खाण्याचे फायदे काय?
तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम
लसूण आणि कांदे खाल्ल्याने तोंडाला तीव्र वास येऊ शकतो कारण त्यात सल्फर संयुगे असतात. कांदा-लसूण खाणे टाळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते.
मानसिक शांती वाढू शकते
आयुर्वेदात म्हटले आहे की कांदे आणि लसूण हे तामसिक अन्न आहे. म्हणजेच ते मनाला अस्वस्थ आणि चिंताग्रस्त करू शकते. अनेकांचा असा विश्वास आहे की हे खाणे टाळल्याने मानसिक शांती वाढते, लक्ष केंद्रित करणे सोपे होते आणि ताण कमी होतो. तसेच योग अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
तर अशापद्धतीने कांदा लसूण खाण्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहे. पण मग कांदा आणि लसूण खावे की बंद करावे?
जर तुम्ही धार्मिक किंवा वैयक्तिक कारणांसाठी कांदे आणि लसूण टाळण्याचा निर्णय घेतला असेल तर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. तुमच्या शरीराला कांदा आणि लसूणमधील सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतील याची खात्री करण्यासाठी तुमच्या आहारात इतर पदार्थांचा समावेश असणे फार महत्त्वाचे असते.
कांदे आणि लसूण खाणे अचानक बंद करणे हे शरीरासाठी नुकसानकारकही आहे. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहे. फक्त कांदा, लसूण हे पदार्थ प्रमाणात खाणे नेहमीच फायदेशीर ठरेल.