breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#Covid-19: करोना संकटात भारताला मदत करण्यासंबंधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

नवी दिल्ली |

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून लसींसोबतच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा अनेक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. पहिल्या लाटेत इतर देशांच्या मदतीला धावणाऱ्या भारताला सध्या मात्र इतर देशांच्या मदतीची गरज भासत आहे. यादरम्यान अमेरिकेच्या गरजा भागल्याशिवाय कुठलीही मदत देता येणार नाही अशी भूमिका अमेरिकेने लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याबाबतच्या मागणीवर घेतली होती. मात्र भारतीय अमेरिकी लोकांच्या वाढत्या दबावानंतर अमेरिकेनेही सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी करोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी ट्विट केलं असून, “ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे” असं म्हटलं आहे.

जो बायडन भारतातील स्थितीचा वारंवार आढावा घेत आहेत. यादरम्यान कमला हॅरिस यांनीदेखील ट्विट केलं आहे. “करोनाच्या संकटात भारताला वेगाने अतिरिक्त मदत आणि पुरवठा करण्यासाठी अमेरिकन सरकार भारतीय सरकारसोबत संपर्कात आहे. मदत करत असताना आम्ही धाडसी आरोग्य कर्मचाऱ्यांसहित सर्व भारतीय नागरिकांसाठी प्रार्थना करत आहोत,” असं कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या नेतृत्वाकरुन भारताला मदत करण्यासंबंधी पहिल्यांदाच अधिकृत वक्तव्य आलं आहे. आपला सहकारी भारताला मदत देण्यास उशीर करत असल्याने भारतीय अमेरिकी तसंच पक्षातील काही सहकाऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अमेरिकेकडून भारताला व्हेटिलेटर्स, पीपीई, लसीसाठी कच्चा माल तसंच अनेक गोष्टींचा पुरवठा केला जाणार आहे. अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली.

लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.

वाचा- संतापदायी! वासनेची भूक मिटवण्यासाठी कुत्र्यांवर लैंगिक अत्याचार; नालासोपाऱ्यात एकाला अटक

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button