#Covid-19: 5 महिने कोरोनामुक्त रुग्णांभोवती सुरक्षा कवच; व्हायरस काहीच बिघडवू शकत नाही
![The number of corona victims in the state is 25,64,881](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1800x1200_coronavirus_1.jpg)
वॉशिंग्टन: कोरोनाव्हायरसने जगभर धुमाकूळ घातलेला आहे. यातून अनेक रुग्ण बरे होत आहेत. पण त्यानंतर त्यांच्या शरीरात तयार होणाऱ्या कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज फार काळ शरीरात टिकत नसल्याचं विविध संशोधनांतून समोर आलं होतं. मात्र नव्या संशोधनातून दिलासादायक माहिती मिळालेली आहे. कोरोनाविरोधात शरीरातील अँटिबॉडीज किमान पाच महिने राहतात, असं दिसून आलेलं आहे. अमेरिकेतील माउंट सिनाई या रुग्णालयातील संशोधकांनी हा अभ्यास केलेला आहे.
सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलेलं आहे. रुग्णालयातील रुग्णांची ELISA टेस्ट करण्यात आली आहे. मार्च ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आलेला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये 72,401 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आलेली होती. त्यामध्ये 30,082 जण हे पॉझिटिव्ह आढळून आलेले होते. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीजदेखील आढळून आलेल्या आहेत.
लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधील अभ्यासानुसार इंग्लंडमधील हजारो लोकांमध्ये अँटीबॉडी कमी होत असल्याचं आढळलं आहे. मात्र या संशोधनात त्याच्या उलट दिसून आलं आहे. मुख्य अभ्यासक फ्लोरियन क्रॅमर यांनी सांगितलं, कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीजबाबत आमचं निरीक्षण इतर अभ्यासापेक्षा उलटं आहे ज्यांना सौम्य किंवा माध्यम स्वरूपाचा कोरोना आजार झाला आहे अशा 90 टक्क्यांहून अधिक नागरिकांमध्ये अँटीबॉडीचा प्रतिसाद विषाणूला निष्क्रिय करण्याइतका बळकट होता आणि अनेक महिने ही क्षमता टिकली आहे.