breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
#Covid-19: कोरोनाच्या दुसर्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज; फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंच आवाहन
मुंबई: आगामी थंडी आणि दिवाळी सारखा सण पाहता आता आरोग्य यंत्रणा पुन्हा कोरोना फैलावू नये म्हणून सज्ज होत आहे. दरम्यान त्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग वाढवले जाईल. तसेच दिवाळी फटाकेमुक्त ठेवण्याचं आवाहनही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला केलेले आहे. हा आग्रह कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांसमोरही करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.