#Covid: कोरोना विषाणू पासून बरे झाल्यानंतर 5 महिन्यांपर्यंत अबाधित राहते रोगप्रतिकारशक्ती; रिसर्चमधून खुलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-2.jpg)
पुणे: कोरोना व्हायरस संबंधित रोग प्रतिकारशक्तीवर केलेल्या संशोधनात एक महत्वाची बाब समोर आलेली आहे. यामध्ये निष्पन्न झाले आहे की, SARS-CoV-2 विषाणूच्या संसर्गानंतर मानवी शरीरात प्रतिकारशक्ती सुमारे 5 महिने अबाधित राहते. भारतीय वंशाच्या संशोधकांनी अमेरिकेत हे संशोधन केलेले आहे. अॅरिझोना विद्यापीठातील संशोधकांनी कोरोना विषाणूची लागण झालेल्या सुमारे 6000 लोकांच्या नमुन्यांचा अभ्यास केलेला आहे आणि अँटीबॉडीज तयार होण्याचा अभ्यास केलेला आहे.
‘अॅरिझोना युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य म्हणाले, ‘आम्हाला स्पष्टपणे दिसून आले आहे की, संसर्गानंतर पाच-सात महिने उच्च प्रतीच्या अँटीबॉडीज शरीरात राहिलेली आहेत. इम्यूनिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे म्हटले आहे की, कोविड-19 शी लढण्यासाठी विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीबद्दल बर्याच लोकांनी सांगितले आहे की, ती जास्त काळ टिकत नाही.
आता आम्ही या अभ्यासाद्वारे या प्रश्नाची तपासणी केली आणि आढळून आले आहे की, रोग प्रतिकारशक्ती असते आणि ती कमीतकमी 5 महिने कायम राहते. अॅरिझोना युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जानको निकोलिच-झुगिच (Janko Nikolich-Zugich) यांनी सांगितले की, जेव्हा विषाणू पेशींना संसर्गित करतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती अल्पायुषी प्लाझ्मा पेशी बनवते जे विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतात. या अँटीबॉडीज संक्रमणाच्या 14 दिवसांच्या आत रक्ताच्या चाचणीत दिसून येतात.