breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखा, अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारला सल्ला

केंद्र सरकारडून अथक प्रयत्न केले जात असले तरी अद्यापही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलेलं नाही. करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ होताना दिसत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारला ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची योजना आखण्याचा सल्ला दिला आहे. राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा मांडला. जिल्ह्यातील इतर आमदार, खासदारही यावेळी उपस्थित होते.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपयायोजनांचा केंद्रीय पथकाने आढावा घेतला. यासाठी ते शुक्रवारी पुण्यात दाखल झाले होते. दरम्यान आमदार, खासदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करत चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.

अमोल कोल्हे यांनी यावेळी ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ योजना आखण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की, “ज्याप्रमाणे आपण टीबी, मलेरियासारख्या आजारांसह दैनंदिन आयुष्य जगत आहोत त्याचप्रमाणे ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ अशी योजना केंद्र सरकारने आखली पाहिजे”. “लॉकडाउन दीर्घकाळ सुरु ठेवणं आपल्या उद्योग, कामगार आणि नोकरदार वर्गाला परवडणारं नाही. सोबतच अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसत असल्याचं,” अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं.

अमोल कोल्हे यांनी ग्रीन झोनमध्ये सर्वात प्रथम ‘को एक्झिस्टिंग विथ कोरोना’ ची अमलबजावणी केली पाहिजे असं सुचवलं. त्यानंतर ऑरेंज आणि रेड झोनमध्ये सुरुवात करु शकतो असं ते म्हणाले आहेत. यावेळी अमोल कोल्हे यांनी मास टेस्टिंग केली जात नसून ती गरजेची असल्याचंही मत नोंदवलं आहे. तसंच परराज्यातील कामगारांना त्यांच्या घऱी जाण्यासाठी विशेष ट्रेनची सुविधा उपलब्ध करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीवर विचार केला पाहिजे असंही म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button