breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#coronavirus: कोरोना विषाणू पूर्णत:शरीरातून जाण्यासाठी लागतो इतक्या दिवसांचा कालावधी- रिपोर्ट

नवी दिल्ली: जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. सध्या जगात एकूण 2 कोटी 58 लाख 89 हजार 824 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 कोटी 81 लाख 72 हजार 671 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 8 लाख 60 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, जगभरात तब्बल 68 लाख 56 हजार 883 अॅक्टिव्ह रुगण आहेत. त्यामुळे आता साऱ्या जगाचं लक्ष कोरोना विषाणूच्या लशीकडे लागलेले आहे. दरम्यान, काही देशांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढत चाललेली आहे.

यातच आता इटलीमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरस शरीरातून कायमचा जाण्यासाठी किती कालावधी लागतो, याबाबत माहिती दिलेली आहे. या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संक्रमित रुग्णाच्या शरीरातून व्हायरस जाण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतोय. त्यामुळे रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर एका महिन्यांनी त्यांची दुसरी चाचणी केली गेली पाहिजे. एवढेच नाही तर त्यांनी असेही सांगितले की पाच निगेटिव्ह चाचणींपैकी एकाचा निकाल चुकीचा असू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button