#CoronaVirus: आजच मिळणार जगाला कोरोनाला हरवणारी लस? ट्वीटमुळे खळबळ
लंडन: गेल्या सात महिन्यांपासून सारं जग कोरोनाव्हायरस नावाच्या अदृश्य अशा संकटाशी सामना करत आहे. जगभरात आतापर्यंत 1.5 कोटी लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर, कोव्हिड-19 मुळे तब्बल 6 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच कोरोनावर उपायकारक ठरणारी लस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तब्बल 100 देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. मात्र पहिल्यांदाच कोरोना लशीबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे.
लांसेट या प्रसिद्ध मॅगजिनचे संपादक रिचर्ड होर्टन यांच्या ट्वीटमुळे खळबळ माजलेली आहे. रिचर्ड यांनी सोमवारी, 20 जुलैला ट्वीट करत, उद्या कोरोनावर लस मिळणार आहे, असे सांगितले आहे. याचा अर्थ 21जुलै रोजी जगाला कोरोनाला हरवणारी लस अखेर मिळणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. रिचर्ड यांनी केलेले हे ट्वीट चर्चेत आले आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस अंतिम टप्प्यात आली असून, आज या लशीबाबत मोठी घोषणा होऊ शकते आहे. सध्या जगभरातील 140 कंपन्या लस तयार करत आहे, या सगळ्यांवर जागतिक आरोग्य संस्था लक्ष ठेवून आहे.
Tomorrow. Vaccines. Just saying.
— richard horton (@richardhorton1) July 19, 2020