breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: अमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनची तिसरी चाचणी सुरु; ट्रम्प म्हणाले, दोन आठवड्यात GOOD NEWS

वॉशिंग्टन : कोरोनाव्हायरसच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेले आहे की लवकरच या लसबाबत काही चांगली बातमी समजणार आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, “कोरोना लसबद्दल मला इतके सांगायचे आहे की आम्हाला येत्या दोन आठवड्यात चांगली बातमी ऐकायला मिळेल.” आम्ही लवकरच या संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा करु. तत्पूर्वी, राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी  (NIH) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की अमेरिकन शास्त्रज्ञांनी बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉडर्ना यांनी विकसित केलेल्या संभाव्य COVID-19 लसची तिसरी चाचणी सुरू केलेली आहे.

एनआयएच सुमारे ३०,००० स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेत आहे. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात, या लसचा परिणाम ४५ स्वयंसेवकांवर दिसून आला. फ्लोरिडा येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती माईक पेंस म्हणाले की, लस चाचणीचा निकाल चांगला दिसला आणि वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अमेरिकी लस चाचणीत मदत करण्यासाठी अमेरिकेच्या सरकारने मोडेर्नाला आणखी ४७२ दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. यापूर्वी एप्रिलमध्ये कंपनीला ४८३ दशलक्ष मिळाले होते. कंपनीचे म्हणणे आहे की, अतिरिक्त निधी त्याला लस बनवण्यास बराच काळ जाणार आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस किती प्रभावी आहे हे शोधण्यासाठी सुमारे ३० हजार लोकांवर संशोधन केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिका हा जगातील सर्वात जास्त कोरोना बाधित देश आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोविड -१९च्या ४.२ दशलक्षाहूनही जास्त रुग्णांची नोंद झाली आहे आणि किमान १,४६,००० लोकांचा बळी गेलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button