गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती
![Children infected with measles will be isolated for 7 days; Information from Health Minister Tanaji Sawant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Tanaji-Sawant-675x470.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी 800 पेक्षा जास्त लोकांची टीम कार्यरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी 800 पेक्षा जास्त लोकांची टीम कार्यरत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लसीकरणावर भर दिला जात आहे. तसेच, लहानमुलांमध्ये गोवरची लागण सर्वाधिक होत असल्यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही तानाजी सावंत यांनी केले.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील गोवर रुग्णांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, “गोवर झालेल्या बालकांच्या विलगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. लसिकरणाच्या बाबतीत जनजागृती करणे सुरू आहे. तपासणी टीम कार्यरत आहेत. गोवर आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे”
“वडाळ्यात 4 महिन्याच्या चिमुकल्याचा लस दिल्यानंतरही मृत्यू झाला. मुंबईत आता गोवर बाधित रुग्णांची संख्या 308 वरती गेली आहे. गोवर विरोधात काम करण्यासाठी यंत्रणा तयार आहे”, असेही यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. गोवर बाधित बालकांना 7 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी 800 पेक्षा जास्त लोकांची टीम कार्यरत आहे.