breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

छातीत कफ झालाय? मग हे घरगुती उपाय नक्की करा

Home Remedy For Cough | अनेकदा थंडीमुळे झालेला कफ लवकर जात नाही. छातीत कफ साठल्यानंतर कमालीचे अस्वस्थ व्हायला होते. यावर वेळीच काही उपाय न केल्यास श्‍वसनमार्गात संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्या व्यक्‍तीच्या छातीत कफ साठलेला असतो त्यांना छातीत दुखणे किंवा घसा दुखणे असे त्रास होतात. आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

हळद : हळद अँटी-बॅक्टेरियल असते. त्यामुळे कफ आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. मध, गूळ आणि हळद हे एकत्रित करून खावे, असे केल्याने खोकल्यापासून सुटका मिळते.

हेही वाचा   –  केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम

गुळण्या करणे : घसा, सर्दी आणि खोकल्यावर उत्तम उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे आहे. नियमित सकाळी गुळण्या केल्याने घशाचा संसर्ग लवकर बरा होतो.

लिंबू : लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी उपयुक्त असतात. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.

आले : आल्यामध्ये अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत जे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी योग्य असू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button