Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

मधुमेहग्रस्त लोक रवा खाऊ शकतात का? काय होतो परिणाम? तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या

Semolina Benefits For Diabetes : रवा भारतीय घरांमध्ये उपमा ते शिऱ्यापर्यंत (हलवा) अनेक पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. परंतु, जे लोक मधुमेहाची औषधे घेत आहेत, त्यांनी रव्याचे पदार्थ खावेत की नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. याबाबत ‘क्वोरा’ वर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या एंडोक्रिनोलॉजी कन्सल्टंट डॉ. स्वाती गोरे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “मधुमेहाच्या रुग्णांसाठी रवा पूर्णपणे वर्ज्य नसला, तरी तो खाताना खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.”

“तुम्ही मधुमेहींच्या आहारात (डाएट प्लॅन) रव्याचा समावेश करू शकता, परंतु प्रमाणावर नियंत्रण ठेवणे (पोर्शन कंट्रोल) अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण रव्यामध्ये कॅलरीज आणि कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स) जास्त प्रमाणात असतात. त्याचे अतिसेवन केल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते,” असे डॉ. गोरे यांनी स्पष्ट केले.

रव्याचा रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो? इतर आरोग्यदायी धान्यांच्या तुलनेत रवा रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतो, हा मुख्य चिंतेचा विषय आहे. डॉ. गोरे स्पष्ट करतात की, “अक्ख्या धान्यांच्या (Whole Grains) तुलनेत रवा ज्या वेगाने रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढवतो, तो वेग जास्त असतो. याचे कारण म्हणजे रवा हा प्रक्रिया केलेला (रिफाईंड) असतो आणि त्यामध्ये फायबरचे (तंतुमय पदार्थ) प्रमाण कमी असते.”

हेही वाचा –  अभिनेते जास्त कमावतात की एन्फ्लुएन्सर? अमेय वाघने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, “आठवड्याला आयफोन…”

रव्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) हा मध्यम स्वरूपाचा (साधारणपणे ५४ ते ६६ च्या दरम्यान) असतो. हे पाहता तो सुरक्षित वाटू शकत असला, तरी केवळ ‘जीआय’वरून संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. “रव्यामुळे रक्तातील ग्लुकोजमध्ये मध्यम वाढ होते. तथापि, त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्याने, तुम्ही तो किती प्रमाणात खाता, यावरच रक्तातील ग्लुकोजची प्रतिक्रिया अवलंबून असते,” असे डॉ. स्वाती यांनी स्पष्ट केले.

याचा अर्थ असा की, एखादा पदार्थ मध्यम GI असलेला असला, तरी तो मोठ्या प्रमाणात खाल्ला, तर साखरेची पातळी अचानक वाढू शकते.

रवा खाण्याची योग्य आणि ‘स्मार्ट’ पद्धत:

-जेव्हा रव्याचे सेवन भरपूर फायबर असलेल्या भाज्या, प्रथिनयुक्त (प्रोटीन) अन्नपदार्थ आणि निरोगी फॅट्ससोबत केले जाते, तेव्हा शरीराद्वारे ग्लुकोज शोषून घेण्याचा वेग मंदावतो. यामुळे रक्तातील साखर स्थिर राहण्यास मदत होते.

-रव्यामध्ये जाडसर किंवा कमी रिफाईंड प्रकारची निवड करा.

-रवा जास्त शिजवणे टाळा, कारण जास्त शिजवल्याने त्याचा ग्लायसेमिक प्रभाव वाढू शकतो.

-खाण्याच्या प्रमाणावर (पोर्शन साईज) विशेष नियंत्रण ठेवा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button