Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिगारेट इतकेच सामोसा अन् जिलबी धोकादायक? , ‘एम्स’च्या आदेशानंतर दुकानांमध्ये लावणार इशारा देणारे फलक

मुंबई : सिगारेटच्या पाकिटांवर भितीदायक चित्रे असते. सिगारेट ओढणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा त्या पाकिटांवर दिलेला असतो. आता समोसे, जलेबीबाबत आरोग्यविषयक इशारा देणारे फलक लावण्यात येणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी समोसे, जलेबी खरेदी करता त्या ठिकाणी हे फलक लावले जातील.

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व केंद्रीय संस्थांमध्ये एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. ज्यानुसार, तेल आणि साखरेचे प्रमाण असलेले फलक लावायचे आहे. सिगारेट आणि गुटख्याविषयी जागरूकता आणण्यासाठी जसा वैधानिक इशारा देण्यात येतो, त्या धर्तीवर आता प्रत्येक शहरांत खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सवर सामोसा आणि जिलेबी विषयी जागरूकता आणण्यासाठी बोर्ड लावले जाणार आहेत.  खाद्य पदार्थांमध्ये चरबी आणि साखरेच्या स्तराची माहिती देणारे हे फलक असणार आहेत.

केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून अशी सूचना देण्यात आल्या आहेत. एआयआयएमएस प्रमाणे केंद्रीय संस्थाने आदींना अशा सूचनांचे फलक खाद्य पदार्थ मिळतात अशा  रेस्टॉरेन्टस, कॅन्टीन आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चटकदार रंगांच्या या फलकांवर या खाद्य पदार्थांमध्ये किती चरबी आणि साखर असते ते लिहिलेले असेल. खाण्याच्या आणि जगण्याच्या वाईट शैलीना अंगीकारल्यामुळे भारतीय शहरांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण धोकादायक पातळीवर जात असल्याचा इशारा आधीच भारतातील वैद्यकीय संस्थांकडून देण्यात येत आहे.

हेही वाचा – ‘बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या’; डॉ. नीलम गोऱ्हे

फलकावर खाद्यपदार्थामध्ये किती साखर, तेल, ट्रान्स फॅट आहे हे स्पष्ट लिहिले जाईल. म्हणजेच, जसे सिगरेटच्या पाकिटावर धूम्रपाण आरोग्यास घातक आहे. असे लिहिले असते. तसेच आता समोसा, वडा पाव, लाडू, जिलेबी, भजी यांसारख्या खाद्यपदार्थांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.

एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार,  केंद्राच्या मिळालेल्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी आणि कॅन्टीनमध्ये फलक लावण्याची तयारी केली जात आहे. हा उपक्रम मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांविरुद्धच्या लढाईचा एक भाग आहे. हे अभियान थेट साखर आणि तेल जास्त असलेल्या आहाराशी जोडलेले आहे.

खाद्यपदार्थांवर लेबल लावण्याची ही सुरुवात आहे. सिगारेटप्रमाणे खाद्यपदार्थांवर लेबल लावणे गरजेचे आहे. साखर आणि चरबी आता नवीन तंबाखू बनले आहे. आपण काय खात आहोत, हे लोकांना माहीत असणे गरजेचे आहे, असे कार्डियॉलजिक सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अमर अमाले यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button