Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

बदाम, शेंगदाणे आणि सूर्यफुलाच्या बिया… यापैकी कशामध्ये आहेत सर्वाधिक Vitamin E

Health : तुमच्या त्वचेचे पोषण करून तिला चमकदार बनवण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. याव्यतिरिक्त हे व्हिटॅमिन शरीरातील पेशींचे नुकसानीपासून संरक्षण करते आणि केस, हृदय व डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. सुकामेवा आणि काही बिया हे व्हिटॅमिन ईचे उत्कृष्ट स्रोत आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की बदाम, शेंगदाणे, अक्रोड आणि सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या कोणत्या सुकामेव्यामध्ये सर्वाधिक व्हिटॅमिन ई असते?

तुम्ही जर तुमच्या त्वचेची चमक वाढवण्यासाठी चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावत असाल, तर त्याआधी तुम्ही तुमच्या आहारात या व्हिटॅमिनने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्याला फायदा होतो आणि तुमचा चेहरा तेजस्वी राहतो, यासोबतच तुमची त्वचा आतून निरोगी होते. चला व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेल्या बिया आणि सुकामेव्याबद्दल जाणून घेऊयात.

बदामातील व्हिटॅमिन ई -चे प्रमाण

USDA च्या आकडेवारीनुसार 100 ग्रॅम बदामांमध्ये 25.6 ग्रॅम व्हिटॅमिन ई (अल्फा-टोकोफेरॉल) असते. हा व्हिटॅमिन ईचा प्रकार मानवी शरीरासाठी सर्वात आवश्यक आहे, कारण हे व्हिटॅमिनचे जैव-सक्रिय स्वरूप आहे. या व्हिटॅमिनचे दररोज सेवन केल्याने आवश्यक पोषक तत्वे मिळतात.

हेही वाचा –  नऊवारी साडी, केसात गजरा, कपाळावर मोठी टिकली; श्रद्धा कपूरचा धमाका, प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात

सूर्यफुलाच्या बियांमधील व्हिटॅमिन ई चे प्रमाण

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 100 ग्रॅम सूर्यफुलाच्या बियांमध्ये 26.1 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई (अल्फा-टोकोफेरॉल) असते. त्यात व्हिटॅमिन ई गटातील एक प्रकार असलेले बीटा-टोकोफेरॉल देखील असते.

शेंगदाण्यांमधील व्हिटॅमिन ई- चे प्रमाण

USDA नुसार 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 8.33 मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई (अल्फा-टोकोफेरॉल) असते. मात्र शेंगदाणे हे प्रथिनांच्या बाबतीत बदाम आणि सूर्यफुलाच्या बियांपेक्षा श्रेष्ठ आहेत. शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 25.8 ग्रॅम प्रथिने असतात. तसेच यात ओमेगा-6 चा देखील एक उत्कृष्ट स्रोत आहेत.

या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते

व्हिटॅमिन ई बद्दल बोलायचे झाल्यास, सुकामेवा आणि बियांसोबतच व्हीट जर्म ऑइल हे देखील व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्रोत आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते 100 ग्रॅम व्हीट जर्म ऑइलमध्ये 149 मिग्रॅ व्हिटॅमिन ई (अल्फा-टोकोफेरॉल) असते. या तेलाच्या एका चमच्यामधून अंदाजे 20.3 मिग्रॅ व्हिटॅमिन ई मिळते.

तर बदाम, शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बिया यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन ई ची कमतरता कधीच भासणार नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button