TOP Newsआरोग्यटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

अतिरिक्त पशुसंवर्धन डॉ. धनंजय परकाळे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होणार

पुणेः डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्त आयुक्त (पशुसंवर्धन) हे पशुसंवर्धन विभागातील ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. सन १९८७ पासून विभागात पशुधन विकास अधिकारी ते अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन या पदापर्यंत पोहोचलेले एक कार्यक्षम व तांत्रिक विषयातील तज्ञ अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोल्हापूर, पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यात त्यांनी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयापासून प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त या पदापर्यंत कामकाज केले व शेवटी १ ऑगस्ट १९ पासून आज अखेर अतिरिक्त शुसंवर्धन म्हणून त्यांनी कामकाज पाहिले.

आपल्या एकूण विभागातील कार्यकाळात अनेक जुन्या पशुसंवर्धन विषयक योजनांची पुनर्रचना, अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमाची सुरुवात त्यांनीच केली. सध्याच्या पुण्यातील आयुक्तालयाची इमारत उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. बोव्हाईन ब्रीडींग कायद्याचा मसुदा, अनेक पशु शल्यचिकित्सा, हजारो पशु वंध्यत्व निवारण शिबिरातून उपचार, सोबत ग्लॅंडर्स या महाभयंकर संसर्जन्य आजाराचे निदान त्यांनी महाराष्ट्रात १०० वर्षानंतर पहिल्यांदा केले.

त्याचबरोबर बर्ड फ्ल्यू, लंपी चर्मरोग यांच्या रोग नियंत्रणात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. पुणे येथे ताथवडे प्रक्षेत्रावर भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा देखील उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. राज्यातील पशुपालकांना लिंगवर्गीकृत रेत मात्रा मिळवून देण्यामध्ये देखील त्यांनी मोलाचे काम केले आहे. पशुप्रजनन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्यामुळे त्याचा पुरेपूर वापर आपल्या कार्यकाळात पशुपालकांना कसा होईल यासाठी प्रयत्न केला. कॉलेज जीवनात अत्यंत हुशार व सुवर्णपदकाचे मानकरी राहिले आहेत. सेवाकाळात नेदरलँड, अमेरिकेत दुग्ध व्यवसाय व पशु अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास दौरा देखील केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button