गेल्या 24 तासांत देशभरात 37,593 नवे कोरोना रुग्ण, 648 मृत्यू
![37,593 new corona patients, 648 deaths across the country in the last 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/383720-corona-logo-6.jpg)
पुणे | भारतात गेल्या 24 तासांत 37 हजार 593 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला देशात 3 लाख 22 हजार 327 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 25 लाख 12 हजार 366 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 17 लाख 54 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 34 हजार 169 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 648 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 35 हजार 758 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.66 टक्के एवढा झाला आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 51 कोटी 11 लाख 84 हजार 547 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 92 हजार 755 नमूने तपासण्यात आले आहेत.लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 59 कोटी 55 लाख 04 हजार 593 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत 61 लाख 90 हजार 930 जणांना लस टोचण्यात आली आहे.