खेडमध्ये 24 नवीन रुग्ण; 2 मृत्यू; 56 डिस्चार्ज
![24 new patients in Khed; 2 deaths; 56 Discharge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/corona-mutation-e1613720003185-3.jpg)
पुणे | खेड तालुक्यात शुक्रवारी (दि.20 ) 12 गावे आणि 3 पालिकांमध्ये 24 रुग्ण मिळून आले आहेत. तर 2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. महाळुंगे येथील 35 वर्षीय पुरुषाचा आणि शिरोली येथील 31 वर्षीय महिलेचा यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदरचे मृत्यू मागील काही दिवसातील असून शुक्रवारच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 70 झाला आहे. यापैकी 33 हजार 382 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात 56 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्यस्थितीत 196 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 2 मृत्यूने 492 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 18 रुग्ण, चाकण 3, आळंदी 2, राजगुरुनगर 1 असे एकुण 24 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.
खेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
आंबेठाण, चऱ्होली खु. , दावडी, डेहने, धानोरे, कडाचीवाडी, कोहिंडे बु., शेलगाव या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे. शेलपिंपळगाव, शिरोली, कडूस या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण मिळाले असून खराबवाडी मध्ये 4 रुग्ण असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.