सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक, आरोग्य विभागाचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/download-42.jpg)
संपूर्ण जगात कोरोनाचे संकट आहे. देशातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सॅनिटायझर वापरण्याचे निर्देश वारंवार दिले जातात. पण सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. गेल्या सहा महिन्यांत सॅनिटायझरचा वापर वाढल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदवले आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी यापूर्वी सांगितले होते की सॅनिटायझरचा अतिवापर केल्यामुळे त्वचेला स्वस्थ ठेवणारे चांगले विषाणू मरतात. जर साबण आणि पाण्याच्या पर्याय असेल तर सॅनियाटायझरचा वापर टाळावा असेही तज्ज्ञांनी सुचवले होते.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आर.के वर्मा म्हणाले की सध्या अतिशय संकटाचा काळ आहे. अशा प्रकारचे साथरोग येईल याचा विचारही कोणी केला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरा, सतत कोमट पाणी प्या, हात धुत रहा आणि सॅनिटायझरचा अतिवापर टाळा असेही डॉ. वर्मा म्हणाले.