breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

मोठा खुलासा! ‘वुहानच्या लॅबमधूनच झाला कोरोना विषाणूचा प्रसार’, चिनी शास्त्रज्ञानं दिला पुरावा

पेइचिंग: जगभरात 2 कोटींहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. चीनच्या वुहानमधूनच कोरोना पसरल्याचा आरोप अजूनही जगभरातील अनेक देश करत आहेत. आता चीनमधील एका प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्टने म्हटलेले, तिच्याकडे पुरावे आहेत आणि हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे ती सिद्ध करू शकते. हाँगकाँग स्कूलचे चीनचे व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली-मेंग यान यांनी असा दावा केलेला आहे की, कोरोनाचा प्रसार होण्यास सुरू झाली नव्हती तेव्हा पेइचिंगमध्ये कोरोनाबाबत माहितीही मिळालेली होती. हा दावा केल्यापासून ली-मेंग या जीव वाचवण्यासाठी पळत आहेत.

नुकत्याच ली-मेंग या Loose Women या कार्यक्रमात आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी दावा केला की चिनी सरकारने तिची सर्व माहिती सरकारी डेटाबेसमधून काढून टाकलेली आहे. डॉ. यान यांनी दावा केला आहे की वुहान मार्केटमध्ये कोव्हिड-19 पसरल्याची बातमी म्हणजे एक फसवणूक आहे. तसेच, यान या एक रिपोर्ट प्रकाशित करणार आहे ज्यात हा व्हायरस मानवनिर्मित असल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत. डॉ. यान जीव वाचवण्यासाठी सध्या अमेरिकेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button