breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात सुट्टी सिगारेट व बिडी विक्रीवर बंदी- महाराष्ट्र शासन

पुणे: राज्यातील धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींसाठी एक वाईट बातमी आहे. यापुढे राज्यात सुटी सिगरेट किंवा बिडी कोणीही विकत घेऊ शकणार नाही. कारण सुटी सिगरेट किंवा बिडीच्या विक्रीवर महाराष्ट्र सरकारने निर्बंध लावलेले आहेत. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. या निर्णयामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यात काहीसा गोंधळ उडाला आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा 2003 (जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) या अंतर्गत सेक्शन 7 च्या सब सेक्शन 2 अंतर्गत महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढत सुटी सिगरेट आणि बिडीच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे. या आदेशावर आरोग्य विभागाचे प्रिन्सिपल सेक्रीटरी डॉ. प्रदीप व्यास यांनी स्वाक्षरी केलेली आहे.

सुटी सिगरेट आणि बिडी विकत घेणाऱ्या ग्राहकांना सिगरेटच्या पाकीटावर लिहिलेली आरोग्यदायी चेतावणी दिसत नाही. सिगारेट आणि बिडीच्या पाकीटावर फोटोग्राफीक स्वरुपात आरोग्यसाठी घातक असलेला मजकूर लिहिलेला असतोय. जेव्हा एखादा ग्राहक एक  किंवा दोन सिगरेट वा बिडी विकत घेतो तेव्हा त्याला त्या सिगरेटच्या पाकीटावरील सूचना दिसत नाहीत. यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे डॉक्टरांनी स्वागत केलेले आहे. तर या निर्णयामुळे ग्राहक आणि विक्रेते संतप्त झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांमध्ये सिगरेट ओढण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी व्यक्त केलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button