जिल्हा रूग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप
पिंपरी – किमान वेतन, नियमित वेतन वाढ, व विनाअट शासनाच्या सेवेत सहभागी करून घेणे यासारख्या मागण्यांच्या कारणास्तव येथील जिल्हा रूग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अधिकारी व कर्माचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे रूग्णांच्या सेवेवर त्याचा परिणाम झाल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शेळके म्हणाले, “सकाळी अकराच्या सुमारास मला बंदच्या संदर्भातील निवेदन मिळाले. आमच्याकडील नियमित स्टाफ, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, शिकाऊ परिचारीका यांच्यामुळे रूग्णसेवेवर कोणताही ताण आला नाही. लहानमुलांचा वॉर्ड, डायलेसिस सारख्या ठिकाणी काम करणारे कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याने सर्व सुरळीत चालु आहे.” संप मागे घ्यायचा की पुढे तसाच चालु ठेवायचा हे आज मुंबई येथे आरोग्य मंत्र्यांसमवेत होणाऱ्या चर्चेवर अवलंबून राहील.