breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

कोरोना संकटातून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी अजून ‘एक’ धक्का, करावा लागणार या आजारांचा सामना

कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे त्याचप्रमाणे कोरोनाची लागण झालेल्यांमधून बरेच रुग्ण हे बरेही होत आहेत.मात्र बरे झाल्या नंतरही रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार असल्याचं समोर आलं आहे.

अलिकडे ब्रिटेनमधील सरकारी आरोग्य संस्था नॅशनल हेल्थ सर्विस(NHS) ने दावा केला आहे की, कोरोनातून बाहेर आलेल्या रुग्णांना दीर्घकाळपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. श्वास घ्यायला त्रास होणं, थकवा येणं अशी लक्षणं दिसून येत आहेत. या समस्या अजून कितीवेळपर्यंत राहू शकतात.  याबाबत माहिती मिळालेली नाही. 

ब्रिटेनमधील एजेंसी नॅशनल हेल्थ सर्विस (एनएचएस) ने कोरोना रुग्णांसाठी अलर्ट जारी केला आहे.  तज्ज्ञांच्यामते कोरोना व्हायरसचा परिणाम दीर्घकाळपर्यंत शरीरावर होऊ शकतो. कोरोनातून बाहेर आल्यानंतर माणसाच्या शरीरावर होत असलेल्या परिणामांबाबत रिसर्च सुरू आहे. कोरोनाने ज्या रुग्णांना अधिक गंभीर आजारी केले. त्यांना भविष्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोनातून बरे झाल्यानंतर हार्ट एरिथमिया अथवा एंझाइमचा दीर्घकाळ सामना करावा लागू शकतो.

त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांमध्ये स्ट्रोक, किडनी डिसीज, शरीरातील अवयवांच्या क्षमतेवरील परिणाम दिसून आला. रुग्णांच्या ज्यामुळे मानसिक असंतुलन, श्वास घेण्यासाठी त्रास होणं, हृदयरोगांसारख्या समस्या कमी होऊ शकतात. 

मागील काही दिवसात चीनमध्ये केलेल्या संशोधनानुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये डिप्रेशन, इंसोमेनिया, ईटिंग डिसॉर्डर आणि विविध प्रकारचे मानसिक आणि न्यूरोलॉजिकल समस्या असतात. याशिवाय, त्यांचे स्नायू आणि बॉडी फंक्शनमध्येही विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button