कोरोनापासूनच बचाव करण्यासाठी वाफ घेताय? पण त्याचे दुष्परिणामही जाणून घ्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/BLOG_Image01_0.jpg)
सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक घरच्या घरच्या घरीच खुप सारे उपाय करत आहेत. तस की सतत गरम पाणी पिणे, काढा घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असे पदार्थ – फळं खाणे,आणि यातलाच अजून एक प्रकार म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणे.
वाफ घेतल्यानं कोरोना बरा होतो असं अनेकांकडून सांगण्यात येतंय. कोरोनाचे प्रमुख लक्षणं म्हणजे ताप सर्दी खोकला आणि न्यूमोनिया. वाफ घेतल्यामुळे सर्दी किंवा कफ तुमच्या शरीरात राहत नाही आणि कोरोना असेल तर तो निघून जातो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. मात्र वाफ घेतल्यानं खरंच कोरोना बारा होतो का की जास्त आणि सतत वाफ घेतल्यानं काही नुकसान होत ते पाहुयात.
कोरोनपासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे उपाय सुचवले जात आहेत. त्यात एक उत्तम उपाय म्हणजे स्टीम थेरपी, म्हणजेच वाफ घेणे असं बोललं जातंय. वाफ घेतल्यामुळे सर्दी किंवा कफ तुमच्या शरीरात राहत नाही आणि कोरोना असेल तर तो निघून जातो, असं काही लोकांचं म्हणणं आहे.
काही लोकांमध्ये हर्ब्सची वाफ घेण्याचं आकर्षण आहे. यात वाफ घेताना त्या गरम पाण्यात लिंबू,संत्र, लसूण यांचे साल गरम पाण्यामध्ये टाकतात. किंवा विक्स, ओवा, लवंगही टाकतात याला हर्ब्स स्टीम थेरपी म्हणतात. हे सगळे हर्ब्स अँटिमायक्रोबियल असतात जे तुमच्या शरीरातले व्हायरस मारण्यात तुम्हाला मदत करत असतात.
काही लोकंच्या मते रोज १५-२० मिनिटं वाफ घेतली पाहिजे त्यानं कोरोनापासून बचाव करता येतो. मात्र Disease Control and Prevention (CDC) आणि World Health Organization (WHO) नं या दाव्यांना खोटं ठरवलं आहे. स्टीम थेरपीमुळे कोरोना बरा होतो असे कुठलेही दावे खरे नाहीत असं WHO नं देखील म्हंटलं आहे. The Journal Of The American Medical Association (JAMA) च्या एका रिपोर्टनुसार स्टीम थेरपी म्हजेच वाफ घेतल्यानं कफ किंवा सर्दी काही दिवसांत बरीही होते. वाफ घेणारे आणि वाफ न घेणाऱ्यांमध्ये तुलना केली तर वाफ घेणाऱ्यांची सर्दी लवकर बारी झालीये.
दरम्यान डॉक्टर सर्दी किंवा कफ झाला की वाफ घेण्याचा सल्ला देतात. कारण वाफ घेतल्यामुळे तुमच्या नाकातला आणि गळ्यातला म्युकस ज्यामुळे कफ तयार होतो तो पातळ होतो. तसंच तुमच्या शरीरात कमी झालेलं ऑक्सिजनचं प्रमाणही वाढतं त्यामुळे तुम्हाला मोकळा श्वास घेता येतो. आणि घ्यायची असेन तर साध्या पाण्याची वाफ घ्या त्यात काहीह टाकण्याची गरज नाही. मात्र सतत वाफ घेण्याचे काही दुष्परिणामही आहेत ते पाहुयात.
- जास्त वेळ वाफ घेतल्यामुळे तुमच्या शरीरात अतिउष्णता तयार होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आतड्यांना त्रास होऊ शकतो.
- जास्त तापमानावर वाफ घेतल्यामुळे तुमच्या शरीराला हानी होऊ शकते.
- अति वाफेमुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.
- तुमच्या गळ्यातले टिशू बर्न होण्याची शक्यता असते.
- तुमच्या चेहऱ्यावर आणि गालावर लालसर चट्टे येऊ शकतात.
- जास्त वेळ वाफ घेतल्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.
- त्यामुळे या वाफ घेण्याचा उलट परिणामही तुमच्या शरीरावर होऊ शकतो.
त्यामुळे दिवसांतून फक्त एकदा वाफ घेण पुष्कळ आहे. तेही पाच किंवा दहा मिनेटे. 15 मिनिटे किंवा अर्धा तास वाफ घेण्याची गरज नाही. किंवा आठवड्यातून दोनदा किंवा तिनदा वाफ घेतली तरी चालणार आहे. त्यामुळे घरी उपचार करा पण त्याच्या अतिवापरामुळे आपल्या शरिरावरच दुष्परिणाम होणार नाही याची नक्की काळजी घ्या…