breaking-newsआरोग्य

केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे…

हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते.वास्तूनुसारही केळीचे झाड घराच्या समोर अथवा बागेत लावणे शुभ मानले जाते !.. केळीचं पानं वापरण्यामागे जसे धार्मिक कारणं आहेत तसेच वैद्यकीय कारणही आहे…केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत… पाहुयात काय फायदे आहेत…

1…केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात,जे शरीरासाठी चांगले असतात. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज , पुरळ , फोडं अशा समस्या दूर होतात !

2… केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात “एपिगालोकेटचीन गलेट” आणि इजीसीजीसारखे
“पॉलिफिनोल्स अँटिऑक्सीडेंट ” आढळतात. याच पानांमार्फत अँटिऑक्सीडेंट आपणास मिळतात यामुळे त्वचा दिर्घकाळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते. मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो…

3… नियमित केळीच्या पानावर खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारायला मदत होते. ते अधिक चमकदार होतात. 

4…केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोप्पे जाते !

5…केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो !

6…केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व
स्वरयंत्राचे आजार बरे होतात !

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button