breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

उदयनराजे भोसलेंच्या उमेदवारीबाबत गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण; म्हणाले..

सातारा | भाजपकडून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन आज साताऱ्यात आले. त्यांनी उदयनराजेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच दोन्ही नेत्यांत तासभर बंद दाराआड चर्चा झाली.

गिरीश महाजन म्हणाले की, उदयनराजेंना भाजपाने उमेदवारी नकारलेली नाही. त्यांची उमेदवारी निश्चित आहे मात्र महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात तीन जागांच्या पक्षांमध्ये जागा वाटपामध्ये तानातानी सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जागा जाहीर करायला वेळ लागत आहे. उदयनराजे हे भाजपातील महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपानेच त्यांना स्वतःहून उमेदवारी दिली पाहिजे असे सांगितले.

हेही वाचा    –      गुन्हेगारी वर्चस्व राखण्यासाठी कुख्यात अविनाश धनवेचा खून, चार जणांना अटक 

सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राबद्दल तीन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे काही वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उदयनराजे यांना राज्यातील प्रचारासाठी त्यांची भूमिका, त्यांची वेळ जाणून घेण्यासाठी याबाबत चर्चा करण्यासाठी मी साताऱ्याला आलो. त्यांच्या उमेदवारीचा कोणताही तिढा नाही. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जागांबाबत तीन पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फार थोडा कालावधी शिल्लक असल्याने लवकरच पश्चिम महाराष्ट्र बाबत निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. मात्र उदयनराजेंना उमेदवारी नाकारलेले नाही, त्यांना उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नाही, असंही गिरीश महाजन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button