breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

Imran Khan : भारताचा शेजारील देश पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबाद येथून नुकतीच अटक केली गेली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पीएम इमरान खान यांना इस्लामाबाद हाय कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट केसमध्ये अटक केली असल्याचं सांगण्यात येत आहे. पीटीआयचे नेते इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध केला आहे, अशी माहीती आहे.

हेही वाचा – Adipurush Trailer : बहुचर्चित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयाने एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी खान यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कधीही अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती, यामुळे ही कारवाई झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button