breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखांशी फडणवीसांची भेट ,बारामतीमधील राजकीय वातावरण तापलं

इंदापूर : खासदार सुप्रिया सुळे यांचे इंदापूर प्रचार प्रमुख असलेले प्रविण माने यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. दोन्हा बाजूंनी जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीतील दिग्गज नेते या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात सभा घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर इंदापूरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, प्रवीण माने, उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

हेही वाचा – ‘मतदानादिवशी वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना टपाली मतदान सुविधा द्या’; शीतल करदेकर

इंदापूरच्या राजकारणात प्रविण माने हे महत्वाचे नेते मानले जातात. प्रवीण माने हे जिल्हा परिषदेत सभापती होते. सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम आहे. या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. ते शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. या निवडणुकीच्या सुरुवातीलाच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला होता. पण, काही दिवसापूर्वी इंदापूरातील झालेल्या सभेला त्यांनी दांडी मारली होती.  यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या.  प्रविण माने हे सुप्रिया सुळे यांचे इंदापूर तालुका प्रचार प्रमुख आहेत.

दरम्यान, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यामुळे प्रविण माने आता शरद पवार यांची साथ सोडणार का अशा चर्चा सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button