ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पर्यावरण संवर्धनासाठी पुनावळेकरांचा संकल्प!

ग्रीन पुनावळे क्लीन पुनावळे उपक्रम : वनीकरण क्षेत्रात 2000 वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट

पिंपरीः “ग्रीन पुनावळे, क्लीन पुनावळे” या उपक्रमांतर्गत वनीकरण क्षेत्रात टप्प्याटप्प्याने 2000 वृक्षांच्या लागवडीचा संकल्प पुनावळे येथील पर्यावरण प्रेमींनी केला आहे. पहिल्या टप्प्यात पुनावळे येथील वनक्षेत्रात 500 पेक्षा जास्त झाडे लावण्याचा, तसेच हरित, स्वच्छ आणि टिकाऊ पुनावळे निर्माण करण्याचा पर्यावरण प्रेमींचा मानस आहे. येत्या रविवारी दिनांक 16 जून रोजी सकाळी 7.30 ते 11.30 वाजेदरम्यान ग्रीन पुनावळे उपक्रम टीमच्यावतीने पुनावळे येथील जंगलात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. स्वयंसेवक आणि पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ग्रीन पुनावळे उपक्रम टीमच्यावतीने करण्यात आले आहे.

पुनावळे परिसरात झाडे लावण्यासाठी पिंपळ, वड, चिंच, बदाम, लिंब, आंबा, निलगिरी, गुलमोहर अशी व इतर झाडे ठिकाणी झाडे शुक्रवार संध्याकाळपर्यंत लॅटिट्यूड मॉलसमोरील मायहोम सोसायटी, पुनावळे, १८ तसेच आपापल्या सोसायटीमध्ये जमा करावीत, तसेच सोबत लागणारी उपकरणेही घेऊन यावीत. तसेच पुनावळे आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व रहिवाशांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आणि मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रीन पुनावळे क्लीन पुनावळे उपक्रमाचे भविष्यातील टप्पे:
– वृक्षारोपणाचा विस्तार: पुनावळेतील इतर भागात, रस्त्यांच्या कडेने आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण सुरू ठेवणे.
-देखभाल: लावलेल्या झाडांचे नियमित पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्यांना परिपक्व होईपर्यंत सांभाळणे.
-स्वच्छता मोहीम: परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नियमित स्वच्छता मोहीम आयोजित करणे.
– जागृती मोहिमा: स्वच्छ आणि हिरवेगार पर्यावरण राखण्याचे महत्त्व समाजाला समजावणे.

दीर्घकालीन दृष्टिकोन:
– पुनावळेला पर्यावरणीय टिकावाचा आदर्श बनवणे.
– पर्यावरणाबद्दल एकत्रित जबाबदारी आणि सामूहिक भावना निर्माण करणे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button