Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

यश साकारतोय खतरनाक गँगस्टरची भूमिका? 1940 च्या दशकातला गोव्यातला सेट

Entertainment :  दिग्दर्शक गीतू मोहनदास यांच्या ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘केजीएफ’ स्टार, कन्नड अभिनेता यश यामध्ये मुख्य भूमिका साकारतोय. या कन्नड-इंग्रजी चित्रपटाच्या कथेबद्दल फार काही सांगितलं गेलं नाही. परंतु आतापर्यंत प्रमोशनच्या निमित्ताने जे काही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं, त्यावरून हा पीरिअड गँगस्टर ड्रामा असल्याचं कळतंय. आता या चित्रपटाचे युएईमधील डिस्ट्रीब्युटर ‘फार्स फिल्म्स’ने त्यांच्या वेबसाइटवर कथेबाबत बरीच माहिती दिली आहे. यातून या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, त्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची कथा गोव्यातील 1940 पासून ते 1970 च्या दशकादरम्यान घडते. टॉक्सिक हा अत्यंत क्रूर अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. गोव्यात त्याकाळी वसाहतवाद कमी झाला आणि गँगस्टर गँग उदयास आले. अशातच एक माणूस विश्वासघात, भीती, रक्तपात यांच्या जोरावर आपलं साम्राज्य उभं करतो. ‘सत्ता दिली जात नाही, ती घेतली जाते आणि त्याची नेहमीच परतफेड करावी लागते. तस्करीचे मार्ग युद्धभूमी बनतात आणि निष्ठा संशयात बदलते’, अशा काही ओळी इथं अधोरेखित करण्यात आल्या आहेत. या चित्रपटाला 18+ रेटिंग देण्यात आली आहे.

हेही वाचा –  ‘बाह्यस्त्रोत सेवा संस्थांनी दर्जेदार सुविधा द्याव्यात’; मंत्री प्रकाश आबिटकर

टॉक्सिक या चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं असून व्यंकट के. नारायण आणि यश यांनी त्यांच्या ‘केव्हीएन प्रॉडक्शन्स’ आणि ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’ या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात यश, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशच्या करिअरमधील हा 19 वा चित्रपट असून ‘केजीएफ’च्या सीरिजनंतरचा हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचं शूटिंग इंग्रजी आणि कन्नड भाषेत एकाच वेळी पार पडलंय. परंतु इतर दाक्षिणात्य भाषा आणि हिंदीतही तो प्रदर्शित होणार आहे. ‘टॉक्सिक’ हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच तारखेला रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर पहायला मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button