‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ कधी आणि कुठे पाहता येणार?
![When and where to watch Zee Chitra Gaurav Awards 2024](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Zee-Chitra-Gaurav-Award-2024-780x470.jpg)
Zee Chitra Gaurav Award 2024 | सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरस्कार सोहळ्यांची जोरदार चर्चा होत आहे. नुकतंच झी मराठीचा ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळा पार पडला. सध्या या पुरस्कार सोहळ्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
या सोहळ्या दरम्यान अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींना महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यावेळी वाळवी, बाईपण भारी देवा, झिम्मा २ आणि सुभेदार या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा – कचऱ्याच्या बायोमायनिंगमुळे महापालिकेस उपलब्ध होणार २५ एकर जागा
‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सारा अली खान यांनी उपस्थिती लावली होती. प्रेक्षकांना हा पुरस्कार सोहळा १६ मार्च ला सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.