Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

अजय देवगनच्या Dhamaal 4 चा जलवा, The Odyssey, वेलकम टू द जंगल अन् अल्फाचे काय म्हणताहेत आकडे?

Films BO collection : बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू असली तरी अजय देवगनचा ‘धमाल 4’ कमाईच्या बाबतीत आघाडीवर कायम आहे. दुसऱ्या आठवड्यातही या कॉमेडी चित्रपटाने दमदार कामगिरी करत प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राखला आहे

विकेंडला विविध चित्रपटांनी तिकिट खिडकीवर चांगला गल्ला जमवला आहे. चार चित्रपटांमध्ये कलेक्शन वॉर पाहायला मिळाले. हॉलीवुड चित्रपट द ओडिसी (The Odyssey) समोर अजय देवगनच्या धमाल ४, आलिय भट्ट-शर्वरी वाघच्या अल्फा आणि अक्षय कुमारच्या वेलकम ३ ने किती कमावले?

द ओडिसी

क्रिस्टोफर नोलनचा ॲक्शन थ्रिलर द ओडिसी १७ जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला आणि भारतीय बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर १७ कोटी रुपये कमावसे. तर रविवार वीकेंडचा फायदा ही द ओडिसीला झाला. रविवारी चित्रपटाने २१ कोटी रुपयांची कमाई केली.

हेही वाचा –  आषाढी एकादशी निमित्त एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये भक्तिमय पालखी सोहळा उत्साहात

अल्फा बॉक्स ऑफिस कलेक्शन

आलिया भट्टचा ॲक्शन थ्रिलर अल्फा देखील चांगली कमाई केली. हा चित्रपट रिलीज होऊन तीन आठवडे होत आले. शनिवारी ४५ लाख रुपये तर रविवारी ६४ लाख रुपयांचा गल्ला जमवला.

धमाल ४

अजय देवगनचा कॉमेडी धमाल ४ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण झाला. धमाल ४ ने रविवारी १२.७५ कोटींची कमाई केली, ज्यामुळे एकूण कलेक्शन १२४.६४ कोटी रुपये झाले.

वेलकम टू द जंगल

अक्षय कुमार स्टारर चित्रपट वेलकम टू द जंगलने रविवारी ६६ लाख तर शनिवारी ४० लाखांची कमाई केली. आतापर्यंत १३३.११ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केलीय.

येत्या काही दिवसांत या चित्रपटांच्या कमाईत किती बदल होतो, याकडे चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांचेही लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button