रितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
![Video of Riteish-Genelia playing Holi goes viral, watch the video](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Ritesh-Jenlia.png)
मुंबई – अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा या दोघांनी त्यांच्या अभिनयाची छाप बाॅलिवूड इंडस्ट्रीसोबतच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील उमटवली आहे. या दोघांची जोडी सर्वात जास्त लोकप्रिय असून यांचे सोबतचे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडीयावर धुमाकुळ घालतात. अशातच त्यांचा होळीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडीओ आता चालू असलेल्या ट्रेंडिंग गाण्यावर करण्यात आला आहे. इंस्टावर या गाण्यावर आय ब्लिंक स्टेप्स केल्या जातात. मात्र रितेश आणि जेनेलियाने यावर होळीचा व्हिडीओ केला आहे. रितेशने हा व्हिडीओ त्याच्या फेसबूकवरुन शेअर केला आहे.
रितेशने हा व्हिडीओ त्याच्या फेसबूकवर शेअर करताच लोकांचा त्याला भरभरुन प्रतिसाद येऊ लागला. एवढचं नाही तर या व्हिडीओला 1 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत. तसेच हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात फाॅरवर्ड केला जात आहे.दरम्यान, या आधी ‘माऊली’ चित्रपटात एका होळीच्या गाण्यात रितेश आणि जेनेलिया सोबत दिसले होते. या चित्रपटामध्ये जेनेलिया काम करत नव्हती. मात्र, ती या गाण्यामध्ये दिसून येते. तसेच त्या दोघांचं ते गाणं लोकांच्या प्रचंड पसंतीस आलं.
https://www.facebook.com/Riteishd/videos/801071053845334/?t=10