Sameer Khakhar : ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन
![Veteran actor Sameer Khakhar passed away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Sameer-Khakhar-780x470.jpg)
Sameer Khakhar : दुरदर्शनच्या प्रसिद्ध शो नुक्कडमध्ये खोपडीची भूमीका साकरणारे ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर यांचे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांना श्र्वास घेण्यास अडथळा येऊ लागला. त्यामुळे त्यांना रूग्नालयात दाखल करण्यात आले.
ज्येष्ठ अभिनेते समीर खाखर याचे निधन झाल्याच्या वृत्ताला त्यांचे भाऊ गणेश खाखर यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, काल ( मंगळवारी ) सकाळी त्याला श्वसनाचे काही त्रास जाणवले, आम्ही डॉक्टरांना बोलावले आणि त्यांनी आम्हाला त्याला दाखल करण्यास सांगितले. आम्ही त्याला रुग्णालयात नेले आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याचे अनेक अवयव निकामी झाले आणि आज पहाटे 4.30 वाजता त्यांचे निधन झाले. ७१ वर्षांची होती, अशी माहिती गणेश खाखर यांनी दिली आहे.
समीर यांनी दूरदर्शनवर काही लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये काम केलं होतं. ‘नुक्कड, मनोरंजन, सर्कस, नया नुक्कड, श्रीमान श्रीमती आणि अदालत’ या त्यांच्या गाजलेल्या मालिका आहेत. सुरभी चंदना आणि नमित खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘संजीवनी’ मध्ये ते अखेरचे दिसले.