ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार

शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मुंबई : मराठी सिनेसृष्टीचे दिग्गज आणि ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांना काल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली अनेक दशके मनोरंजनातून केलेल्या सेवेची ही पोचपावतीच म्हणावी लागेल. अशोक मामांना हा पुरस्कार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून प्रदान करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी शरद पवारांसंबधीत एक किस्सा उपस्थितांसमोर शेअर केला. तसेच यंदा त्यांच्यावर भरभरुन पुरस्कारांचा वर्षाव झाल्याने त्याप्रतिचा आनंद देखील त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले की, माझ्यासाठी आज आनंदाचा क्षण आहे. आज लायनीत मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. पुरस्कार कुठून मिळतात? कुणाच्या हस्ते मिळतात ते महत्त्वाचं आहे. शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला तेव्हा मी थोडं काही तरी काम केलं आहे असं जाणवलेलं. त्यानंतर दिल्लीत संगीत अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि मग मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. आजचा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते मिळाल्याचा विशेष आनंद आहे.

अशोक मामांनी या कार्यक्रमात शरद पवार आणि त्यांचा एक खास किस्सा शेअर केला. ते म्हणाले की, शरद पवार हे माझे आवडते नेते आहेत. लोकांना माझी कला आवडली, त्यामुळे मी काम करत गेलो. शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद आहे. शरद पवारांकडे एकदा माझं एक काम होतं. त्यांनी फक्त तीन मिनिटांत ते काम केलं. माझा विश्वास नव्हता, मी म्हटलं तुम्ही तिकडे बोला, ते म्हणाले काम झालंय. खरंच ते काम झालं होतं. अजूनही ते प्रत्येकाला नावाने ओळखतात. मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा ते हसले त्यावेळी ते मला ओळखतात हे समजलं. दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा गर्दी होती त्यातही त्यांनी मला ओळखलं. शरद पवारांनी बरंच काम करुन ठेवलं आहे.

अशोक सराफ यांच्यासोबतच काल ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा देखील जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button