Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीमनोरंजनमहाराष्ट्र
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा : सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/6386204.jpg)
मुंबई l प्रतिनिधी
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी (दि. 7 फेब्रुवारी) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, रविवार (दि. 6 फेब्रुवारी 2022) रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (सन 1981 चा अधिनियम 26) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार (दि. 7 फेब्रुवारी) रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.