breaking-newsमनोरंजन

Tiktok स्टार सिया कक्कडची आत्महत्या

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुशांतचे फॅन नसले तरी अनेक लोकं यावर हळहळ व्यक्त करत होते. ही घटना ताजी असतानाच आत्महत्येचे आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे.

16 वर्षीय सोशल मीडिया स्टार सिया कक्करने आत्महत्या केली आहे. सिया सोशल मीडियावर टिकटॉक व्हिडिओमुळे चांगलीच लोकप्रिय झाली होती. या बातमीने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार सियाने काल रात्री तिचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्याशी एका गाण्याबद्दल चर्चा केली होती. पण सियाच्या आत्महत्येची बातमी ऐकून अर्जुनला ही धक्का बसला. अर्जुन म्हणाला की, तिचा फोन आला तेव्हा ती ठीक होती आणि अस्वस्थ देखील वाटत नव्हती. कळत नाहीये की सियाने हे पाऊल का उचलले.’ सिया Tiktok वर खूप लोकप्रिय होती.

सियाने अलीकडेच तिचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला असून त्यामध्ये ती पंजाबी गाण्यांवर नाचताना दिसत आहे. वास्तविक, सियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला व्हिडिओ काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. जी तिची शेवटचे पोस्ट देखील आहे. इंस्टाग्रामवर सियाचे हजारो फॉलोअर्स आहेत.

सियाच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच प्रश्न सुरु आहे की सियाने आत्महत्या का केली? प्रत्येकजण इंस्टाग्रामवर तिला श्रद्धांजली वाहत आहे. पण 16 वर्षीय सियाने हे पाऊल का उचललं या विचाराने चाहते अस्वस्थ देखील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button