breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

‘द काश्मीर फाइल्स’ला यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार; पहा संपुर्ण यादी

Dadasaheb Phalke Award २०२३ : भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मनाला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारचे वितरण करण्यात आलं. यावर्षी एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचा दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ‘RRR’ या चित्रपटाला फिल्म ऑफ द इयर आणि ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर केली आहे. त्यांनी काश्मीर फाइल्सने दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ चित्रपट पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार दहशतवादातील सर्व पीडितांना आणि आशीर्वाद देणाऱ्या भारतातील सर्व लोकांना समर्पित आहे, असं म्हटलं आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ यादी –
बेस्ट फिल्म – द काश्मीर फाइल्स
फिल्म ऑफ द ईयर – RRR
बेस्ट अ‍ॅक्टर – रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र)
बेस्ट अ‍ॅक्ट्रेस – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाड़ी)
क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्टर – वरुण धवन (भेड़िया)
क्रिटिक्स बेस्ट अ‍ॅक्ट्रेस – विद्या बालन (जलसा)
बेस्ट डायरेक्टर – आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमॅटोग्राफर – पीएस विनोद (विक्रम वेधा)
मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर – ऋषभ शेट्टी (कांतारा)
बेस्ट अ‍ॅक्टर सपोर्टिंग रोल – मनीष पॉल (जुग-जुग जियो)
बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल – सांचेत टंडन (जर्सी- माइया मैनूं)
बेस्ट प्लेबॅक सिंगर फीमेल – नीति मोहन (गंगूबाई काठियावाड़ी- मेरी जान)
बेस्ट वेब सिरीज – रुद्र (हिंदी)
मोस्ट व्हर्सेटाइल अ‍ॅक्टर – अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)
टेलीविजन सिरीज ऑफ द ईयर – अनुपमा
बेस्ट अ‍ॅक्टर इन टेलिव्हिजन सिरीज – जेन इमाम (फना)
बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन टेलिव्हिजन सिरीज – तेजस्वी प्रकाश (नागिन)
आउट स्टँडिंग काँट्रिब्यूशन इन फिल्म इंडस्ट्री – रेखा
आउट स्टँडिंग काँट्रिब्यूशन इन म्युझिक इंडस्ट्री – हरिहरन

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button