‘धुरंधर २’सह प्रदर्शित झालेला ‘हा’ दाक्षिणात्य चित्रपट आता ओटीटीवर होणार रिलीज, कधी व कुठे पाहायचा? घ्या जाणून…

Ustad Bhagat Singh OTT Release : दाक्षिणात्य चित्रपटांना थिएटरमध्ये जितका चांगला प्रतिसाद मिळतो. तितकीच क्रेझ या चित्रपटांची ओटीटीवरसुद्धा असते. अशातच आता काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य चित्रपट ज्याने पहिल्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली तो आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
१९ मार्च रोजी ‘धुरंधर २’बरोबर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याणची मुख्य भूमिका असलेल्या ‘उस्ताद भगत सिंग’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता पर्यंत या चित्रपटाने कोट्यवधी कमावले. अशातच आता हा चित्रपट ज्यांना थिएटरमध्ये जाऊन पाहता आला नाही ते घर बसल्या ओटीटीवर पाहू शकतात. हा सिनेमा कुठे व कधी पाहता येईल तसेच चित्रपटाची कथा काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
हरीश शंकर दिग्दर्शित पवन कल्यानची मुख्य भूमिका असलेला ‘उस्ताद भगत सिंग’ हा चित्रपट ओटीटीवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. येत्या १६ एप्रिलपासून घरबसल्या हा चित्रपट पाहता येणार आहे. १६ एप्रिलपासून तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये ओटीटीवर हा चित्रपट रिलीज होत आहे.
आता या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर चित्रपटाची सुरुवात एक कर्तबगार शिक्षकापासून होते. जे आंध्र प्रदेश येथील आदीवासी समुदायातील मुलांना शिक्षण देत असतात. त्यावेळी त्यांची भेट त्याच समुदायातील एका सुशिक्षित मुलाशी होते. ज्याचं नाव असतं भगत सिंग . पवन कल्यानने हे पात्र साकारलं आहे
शिक्षक भगतला अजून चांगलं शिकवतात आणि त्याला पोलिस अधिकारी बनवतात. पोलिस झाल्यानंतर भगत सिंग चुकीच्या गोष्टींविरोधात लढतो. त्यादरम्यान त्याचे शिक्षक राज्याचे मुख्यमंत्री झालेले असतात. परंतु, काही लोक त्यांच्या मृत्यूचा कट रचत असतात. आता भगत सिंग या परिस्थितीला कसा सामोरे जातो हे चित्रपटात पुढे दाखवलं आहे.
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर पवन कल्यान व राशी खन्ना यांच्या ‘उस्ताद भगत सिंग’ या चित्रपटाने जगभरात ९६.६६ कोटींची कमाई केली. भारतात या चित्रपटाने भारतात ७२.२४ कोटींचं नेट कलेक्शन केलंय.





