२०२६मध्ये ‘या’ तमिळ चित्रपटांनी कमावले कोट्यवधी, ओटीटीवरही होते ट्रेंडिंग; कुठे पाहायचे? वाचा…

Best tamil movies 2026 : गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर मोठा दबदबा पाहायला मिळत आहे. यंदाही अनेक तमिळ चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली नाही, तर कमाईचे अनेक विक्रमही मोडले. त्याचबरोबर ओटीटीवरही या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अशाच २०२६ मधील काही सर्वोत्तम तमिळ चित्रपटांविषयी जाणून घेऊया, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस नफा कमावला आणि ओटीटीवरही आपली छाप पाडली.
ब्लास्ट – अर्जुन सरजा यांचा ॲक्शन-ड्रामा चित्रपट ‘ब्लास्ट’ हा २०२६ मधील सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटांपैकी एक मानला जातो. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, या चित्रपटाने भारतात ५२,७१ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं, तर परदेशात १४,४० कोटी रुपयांची कमाई केली. एकूण ग्रॉस कलेक्शन ७४.९४ कोटी रुपयांवर पोहोचले. माहितीनुसार, या चित्रपटाचं बजेट सुमारे १८ कोटी रुपये होतं. त्यामुळे या चित्रपटाने तब्बल ३१६.३३ टक्के नफा कमावला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
करुप्पु – हा सूर्या आणि त्रिशा कृष्णन यांचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने विक्रमी कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने जगभरात २०९.९८ कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतातील नेट कलेक्शन १९८.०५ कोटी रुपये होतं. या चित्रपटाचं बजेट १३० कोटी रुपये होतं. त्यामुळे चित्रपटाने १३८.४५ टक्के नफा कमावला. हा चित्रपट ओटीटी नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
हेही वाचा – भाजपाकडून आगामी संघटनात्मक कार्यक्रमांवर ‘‘मंथन’’
यूथ – हा २०२६ मधील सर्वोत्तम तमिळ चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत चांगली कमाई केली. इतकंच नव्हे, तर ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही तो ट्रेंडिंगमध्ये राहिला. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने ७१.७३ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन, ५२.६२ कोटी रुपयांचं भारतातील नेट कलेक्शन आणि परदेशात ११.४९ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचं बजेट केवळ ५ कोटी रुपये होतं. त्यामुळे या चित्रपटाने तब्बल १,०९५.५ टक्के नफा कमावला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
थाई किझ्झवी – हा कमी बजेटमध्ये तयार झालेला २०२६ मधील गाजलेला तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा अधिक कमाई करत यश मिळवलं. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने ८२.०१ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन, ६२.६२ कोटी रुपयांचं भारतातील नेट कलेक्शन आणि परदेशात १०.३५ कोटी रुपयांची कमाई केली. अहवालानुसार, या चित्रपटाचं बजेट १० कोटी रुपये होतं. त्यामुळे या चित्रपटाने तब्बल ७२० टक्के नफा कमावला. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.





