ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमनोरंजनमहाराष्ट्र

“सुलतान” लघुपटाचा वर्ड प्रिमियर जर्मनीतील स्टूटगार्ट शहरात जूलै मध्ये पार पडणार!

“सुलतान“ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड

पिंपरीः भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. 2004 पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्मब्युरो बॅडेन-वुर्टेमबर्गद्वारे जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे आयोजित केला जातो.

दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला सुलतान या लघुपटाची युरोप खंडातील जर्मनी मधील स्टुटगार्ट या शहरात पार पडत असलेल्या या २१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल स्टुथगार्ट २०२४ साठी अधिकृत निवड झाली असून सुलतान लघुपटाचा वर्ल्ड प्रिमियर जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात जूलै महिण्यात पार पडणार आहे. स्पर्धेतील कित्येक लघुपटाला मागे टाकून सुलतानची या महोत्सवासाठी निवड झाली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सुलतान या लघुकथेवरून प्रेरीत असलेल्या सुलतान लघुपटाचे संपुर्ण शुटिंग बीड जिल्ह्यातील बीड , माजलगाव, पात्रूड , श्रृंगारवाडी -(तालखेड ) या ठिकाणी झाले आहे , ब्लॅक हॅार्स मोशन ह्या चित्रपट निर्माती संस्थेने या लघुपटाची निर्मीती केली असून सहनिर्माता विजय क्षीरसागर आहेत.

या लघुपटात सुलतानच्या प्रमुख भूमिकेत ख्वाडा फेम अभिनेते अनिल नगरकर आहेत तर अभिनेते गणेश देशमुख, अनिल कांबळे , श्रीकांत गायकवाड , संतोष वडगिर, अजय साठे , तानाजी साठे यांच्या भूमिका आहेत , या लघुपटाचे सांऊड डिझानिंग राष्ट्रीय पारितोषिक विजेते प्रसिेद्ध सांऊड डिझायनर अविनाश सोनवणे यांनी केले आहे.कलादिग्दर्शन अतूल लोखंडे तर छायाचित्रण अभिजीत घुले यांनी केले आहे तसेच पार्श्वसंगीत डॅा जयभीम शिंदे यांनी दिले आहे. तर व्हीएफ एक्स एस एम रोलिंगचे पंकज सोनावणे यांनी केले आहे.

दिग्दर्शनाच्या पर्दापणात सुलतानची आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांनी समाधान व्यक्त केले असून सुलतानच्या संपुर्ण टीमवर सर्वत्र कौतूक आणी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button