तारासिंग-सकिनाची प्रेमकहानी २२ वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये झळकणार
![The love story of Tarasingh-Sakina will be seen again in theaters after 22 years](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/gadar-2-780x470.jpg)
Gadar 2 : गदर एक प्रेम कथा हा सिनेमा २२ वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. अनेकांचे मन जिंकणारा हा सिनेमा आता ४K मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर हा सिनेमा भारताच्या फाळणीवर आधारित आहे.
सनी देओलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तेच प्रमे, तीच कथा, पण यावेळी भावना वेगळी असेल..गदर : एक प्रेम कथा पुन्हा एकदा चित्रपटगृहांत परतत आहे. तेव्हा ९ जून रोजी हा चित्रपट ४K आणि डॉल्बी अॅटमॉस आवाजात प्रदर्शित होणार आहे, असं सनी देओलने म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांचा ‘तो’ सल्ला पाळावा’; रामदास आठवलेंचं विधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Snapinsta.app_349037939_247787384597874_8670869110656857422_n_1024-1024x1024.jpg)
गदर २ बद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील फाळणी आणि युद्धावर आधारित आहे. यामध्ये सनी देओल आपल्या मुलाला परत आणण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत अमिषा पटेल, शारिक पटेल आणि उत्कर्ष शर्मा दिसणार आहेत. अनिल शर्मा यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.