‘या’ दोन सदस्यांचा Bigg Boss Marathi तील प्रवास संपला! प्रोमो पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

Bigg Boss Marathi Double Eviction Promo: बिग बॉस मराठी सीझन ६ सीझनमध्ये आज डबल एव्हिक्शन होणार आहे, त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या एपिसोडकडे लागले आहे. आजच्या एपिसोडमधील एलिमिनेशनचा एक प्रोमो समोर आला आहे. आज या घरातून कोण दोन जण बाहेर जाणार, याची झलक प्रोमोत दिसतेय. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सनीही लक्ष वेधून घेतले आहे.
या आठवड्यात प्रभू शेळके, सचिन कुमावत, प्राजक्ता शुक्रे, राकेश बापट, आयुष संजीव, करण सोनावणे हे सहा जण नॉमिनेट झाले आहेत. प्रोमोमध्ये जे सदस्य एलिमिनेट आहेत, ते इतर सदस्यांची भेट घेताना दिसत आहेत. आता यापैकी कोणत्या दोन जणांचा बिग बॉस मराठीतील प्रवास संपतो, ते आज कळेल.
हेही वाचा – ‘विकसित नागपूर-२०४७’ आराखड्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होईल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रोमोमध्ये रितेश देशमुख म्हणतो, “महाराष्ट्राचा महाफैसला म्हणजेच डबल एव्हिक्शन. यावेळेस एका वेगळ्या प्रकारे एलिमिनेशन होणार आहे. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार. आता उघडणार आहे मुख्य द्वार आणि एंट्री करतील सेफ सदस्य.” रितेशने असं म्हटल्यावर घराचं मुख्य द्वार उघडतं, पण त्यातून कोण आत आलं ते दाखवण्यात आलेलं नाही.
खरं तर दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे की करण सोनावणे व आयुष संजीव यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपतोय. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बऱ्याच जणांना वाटतंय की आयुष संजीव व करण सोनावणे दोघे एलिमिनेट झाले आहेत. तर काहींना वाटतंय की सचिन कुमावत व आयुष संजीव दोघे या डबल एविक्शनमध्ये घराबाहेर जातील. तर, काही नेटकऱ्यांना वाटतंय की आयुष संजीव एलिमिनेट झाला असून करण सोनावणेला सिक्रेट रूमध्ये ठेवण्यात येईल. त्या प्रभूचा काय गेम आहे, त्याला कशाला ठेवलंय? असा प्रश्नही एकाने विचारला आहे. आता बिग बॉसमध्ये नेमकं काय घडणार, ते आज रात्री भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल.




