‘मी घेतलेला निर्णय सर्वात बेस्टच…’, घटस्फोटाबाबत व्यक्त झाली मानसी नाईक
!['The decision I took is the best...', Mansi Naik expressed about the divorce](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Mansi-Naik-780x470.jpg)
मुंबई: गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेली अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मानसी अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या डान्सची झलक चाहत्यांना दाखवत असते. मानसी सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. मानसीने पती प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने चाहते चकित झाले आहेत. सध्या मानसी आपल्या पतीपासून विभक्त राहात आहे.
मानसी नाईकने बॉक्सर असणाऱ्या प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत प्रचंड आनंदी होते. मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय होते. दोघे सतत आपले रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोबतच अनेक मजेशीर रील्सदेखील बनवत. इतकंच नव्हे तर एकमेकांच्या फोटोंवर प्रेमळ कमेंट्ससुद्धा करत असत. सर्व काही आलबेल सुरु असताना. मानसीने अचानक आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पती प्रदीपसोबतचे सर्व फोटो हटवल्याने त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं होतं. ‘
त्यांनंतर मानसीने स्वतः या वृत्तांना दुजोरा दिला आहे. मानसीने पती प्रदीप खरेरासोबत विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट अर्जदेखील दाखल केला आहे. या प्रकारानंतर मानसी सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. काहींनी याबाबतीत मानसीला पाठिंबा देत तिचं कौतुक केलंय तर काहींनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केलं आहे. परंतु मानसी आजही तितक्याच नेटाने या सर्वाला सामोरे जात आहे. ती सतत आपल्या नवनवीन पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या मानसी नाईकची एक नवी पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.