“द कश्मीर फाइल्स” चित्रपटातील अभिनेत्रीचा अपघात; वाहनाचे नियंत्रण सुटल्याने धडक
![The accident of the actress in the movie "The Kashmir Files".](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/kashmir-files-movie-780x470.jpg)
हैदराबादमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू; दुखापत गंभीर नाही
मुंबई : 2022 मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी सध्या त्यांच्या आगामी ‘ द व्हॅक्सिन वॉर’ या आगामी चिपटामुळे चर्चेत आहेत. अलीकडेच चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. त्याचवेळी सेटवरून पल्लवी जोशीच्या अपघाताची बातमी आली आहे. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी झाली आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, एका वाहनाचे नियंत्रण सुटले आणि त्यानं अभिनेत्रीला धडक दिली, त्यानंतर अभिनेत्री जखमी झाली. काही दिवसांपूर्वीच ‘द व्हॅक्सिन वॉर’चे शूटिंग सुरू झाले होते, ज्याची माहिती विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियाद्वारे दिली. अशातच आता चित्रपटाच्या सेटवरून पल्लवी जोशीच्या अपघाताची माहिती येताच सर्वांनाच धक्क बसला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, पल्लवी जोशीला कारने धडक दिल्यानं त्या जखमी झाल्या, तरीदेखील त्यांनी आपला शॉट पुर्ण केला आणि त्यानंतर त्या रुग्नालयात उपचारासाठी गेल्या. सुदैवाने पल्लवी जोशी यांना झालेली दुखापत गंभीर नाही. त्यांच्यावर सध्या हैदराबादमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोबतच, ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द वॅक्सिन वॉर’ या आगामी चित्रपटाचे हैदराबाद येथे चित्रिकरण करत आहेत. या सिनेमात त्यांच्या पत्नी पल्लवी जोशींसह नाना पाटेकर, अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट आहे.